पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर १ रुपया ३४ पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलच्या दरांमध्ये २ रुपये ३७ पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे दर १५ दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. त्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात.
आणखी वाचा
#Petrol price hiked by Rs 1.34 per litre, #diesel by Rs 2.37.
— Press Trust of India (@PTI_News) October 15, 2016