जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत नाहीत. याचा परिणाम तेल कंपन्यांच्या उत्पन्नावर होत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नाहीत. निवडणुकीनंतर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे ५ ते ६ रुपयांनी वाढ करू शकतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्यानं कंपन्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशा स्थितीत प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी दरवाढ करणं आवश्यक झालं आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चढत्या राहिल्या तर, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नक्कीच वाढतील.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Daily Petrol Diesel Price
Daily Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरांत काय आहे दर?
edible oil import india
खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या घोषणा हवेतच ! जाणून घ्या, एका वर्षात किती खाद्यतेलाची आयात झाली आणि त्यासाठी किती रुपये मोजले
How to check daily Petrol And Diesel rates
Petrol Diesel Rates In Maharashtra : पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा दर

आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्लेषक प्रबल सेन यांचं म्हणणं आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल एक डॉलरने वाढली, तर देशांतर्गत बाजारात किंमत प्रतिलिटर ४५-४७ पैशांनी वाढते. मात्र परदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी दिवाळीपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. नोव्हेंबरपासून कच्चे तेल प्रति बॅरल २५ डॉलरवर वर पोहोचलं आहे.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम असल्यानं आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती मंगळवारी ९४ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. २०१४ नंतर पहिल्यांदाच क्रूडच्या किमतीने एवढी पातळी गाठली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२५ डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.