जागतिक स्तरावर तेलाचे दर कोसळले असतानाच पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा सरकारने सोमवारी केली. गेल्या पंधरवडय़ातील ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे पेट्रोल लिटरमागे २ रुपये १९ पैशांनी, तर डिझेल लिटरमागे ९८ पैशांनी महागणार आहे. ही वाढ सोमवारी मध्यरात्रीपासून अंमलात आली आहे. दिल्लीत आता पेट्रोलचा दर सध्याच्या ५९.६८ रुपये लिटरवरून ६१.८७ रुपये इतका असेल. तर डिझेलचा दर ४८.३३ वरून ४९.३१ रुपये इतका होईल.
१७ मार्च रोजीच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे तीन रुपये व १ रुपये ९० पैसे इतकी वाढ झाली होती. येत्या पंधरवडय़ात पेट्रोलच्या दरांत दुसऱ्यांदा तर डिझेलच्या दरांत चौथ्यांदा वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलचे आंतरराष्ट्रीय दर तसेच रुपये व डॉलरच्या विनिमय दरांच्या अनुसार ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा ग्राहकांवर मोठा बोजा पडणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा