आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमतीत घसरण झाली असतानाच केंद्र सरकारने डिझेलचे दर जैसे थे ठेवतानाच पेट्रोलच्या देशांतर्गत किमतीत ६५ पैशांनी कपात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असल्याने ही दरकपात पुढे ढकलण्याचा निर्णय आधी घेण्यात आला होता. डिझेलच्या दरात एक रुपया तर पेट्रोलच्या दरात ५५ पैशांनी कपात करण्याचा प्रस्ताव होता; परंतु सरकारने पेट्रोलचा दर कमी केला.
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल व डिझेलच्या नव्या दराची घोषणा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार बुधवारी, १ ऑक्टोबरला डिझेलच्या दरात एक रुपयाने तर पेट्रोलच्या दरात ५५ पैशांनी कपात केली जाण्याची दाट शक्यता होती. परंतु पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर असल्याने या संदर्भातील निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. डिझेलच्या दरात पाच वर्षांत प्रथमच एक रुपयाने कपात होणार आहे. मोदी बुधवारी सायंकाळी मायदेशी परतत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा