महागाईने त्रासलेल्या सामान्यांसाठी सुखद धक्का देणारी बातमी आहे. पेट्रोलचे दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रतिलिटर दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. डिझेलच्या दरात तूर्त तरी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्यामुळे पेट्रोलचे दर कमी होतील, याची शक्यता वर्तविण्यात आली होती. अखेर पेट्रोल कंपन्यांनी दर कमी करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. गेल्या नऊ महिन्यातील ही सर्वात मोठी दरकपात आहे. स्थानिक कर आणि व्हॅट धरून राजधानी दिल्लीमध्ये ही दरकपात प्रतिलिटर दोन रुपये ४० पैसे इतकी असेल. प्रत्येक शहरानुसार यामध्ये फरक होईल. 
पेट्रोलच्या दरात गेल्या दोन महिन्यांत दोनदा वाढ करण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला पेट्रोल प्रतिलिटर दीड रुपयाने महागले. त्यानंतर याच महिन्यात दोन तारखेला पुन्हा प्रतिलिटर १.४० पैशांची वाढ करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी दर कमी करण्याचा निर्णय आल्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा