पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी कपात करण्याचा निर्णय सोमवारी तेल कंपन्यांनी घेतला. पेट्रोल प्रतिलिटर दोन रुपयांनी आणि डिझेल प्रतिलिटर ५० पैशांनी स्वस्त करण्यात आले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर अंमलात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती उतरल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. याआधी ३१ जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांतही अनुक्रमे दोन रुपये ४३ पैसे व तीन रुपये ६० पैशांनी कपात करण्यात आली होती.

Story img Loader