महागाईचे चटके सहन करीत असलेल्या सर्वसामान्यांच्या चेहऱयावर आनंदाची फुंकर घालणारी घोषणा ऑईल कंपन्यांनी सोमवारी केली. पेट्रोलच्या दर प्रतिलिटर ३.०५ रुपयाने स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. केंद्र सरकारने याआधीच स्पष्ट केल्याप्रमाणे डिझेलच्या दरात प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ करण्यात आलीये. गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडत होते. पेट्रोलच्या दरात घट झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

Story img Loader