शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलचा दर प्रति लीटरमागे १.८२ रुपयांनी कमी होत असून डिझेलच्या दरात लीटरमागे ५० पैशांनी वाढ होणार आहे. पेट्रोलचे दर या महिन्यात तीनवेळा कमी करण्यात आले आहेत.  सुधारित दरामुळे दिल्लीत आता पेट्रोलला प्रति लीटरमागे ६८.५१ रु. मोजावे लागतील तर डिझेलसाठी हाच दर प्रती लीटरमागे ५८.९७ रु. राहील. मुंबईकरांना पेट्रोलसाठी लीटरमागे ७६.४१ रु. तर डिझेलसाठी लीटरमागे ६७.२६ रु. मोजावे लागतील.

Story img Loader