देशातील किरकोळ इंधनाच्या किंमती विक्रम मोडत आहेत. आज (मंगळवार) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग दुसर्‍या दिवशी वाढ करण्यात आली. १५ मे पासून एका दिवसाच्या अंतराने किंमतीत सतत वाढ होत आहे, परंतु आज सलग दुसऱ्या दिवशी किंमती वाढल्या आहेत. आज पेट्रोलच्या दरात २७ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही २३ पैशांची वाढ झाली आहे. देशातील बर्‍याच शहरात पेट्रोल १०० च्या पलीकडे विकले जात आहे आणि राजधानी दिल्लीत ते ९४ च्या पुढे विक्री सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन दिवसांत पेट्रोल ५६ पैशांनी महाग झाले आहे. सोमवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर २९ पैसे वाढ करण्यात आली. त्याचबरोबर आजच्या डिझेलच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली. दोन दिवसांत 49 पैशांनी महागले आहे.

मुंबईत पेट्रोलने शंभरी गाठली. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल १००.७२ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९२.६९ रुपये प्रति लिटर विकल्या जात आहे. दिल्लीत पेट्रोल ९४.४९ रुपये प्रति लिटर, डिझेल ८५.३८ रुपये प्रति लिटर झाले आहे. चेन्नईमध्ये  पेट्रोल ९५.९९ रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल ९०.१३ रुपये प्रतिलिटर विकल्या जात जात आहे.

मे मध्ये तेलाच्या १६ वेळा तेलाच्या किंमती वाढविण्यात आल्या. पाच राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल २ मे रोजी जाहीर झाल्यानंतर तेलाच्या किंमती ४ मेपासून वाढू लागल्या. यापूर्वी, तेलाच्या किंमतींमध्ये जवळपास दोन महिन्यांपर्यंत कोणतीही वाढ झाली नव्हती, तर एप्रिलमध्ये फक्त अधून-मधून कपात झाली होती. पण ४ मे नंतर इंधनाच्या किंमतींना आग लागली. मे महिन्यात झालेल्या वाढीमुळे पेट्रोल प्रतिलिटर ४.१७ पैशांनी महाग झाले आहे. त्याचबरोबर डिझेलच्या दरात लिटरमागे ४.६० रुपयांची वाढ झाली आहे.

आपल्या शहरातले इंधनाचे दर कसे जाणून घ्याल? 

देशात तेलाच्या दरात दररोज सकाळी ६ वाजता सुधारित केले जातात. कारण देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. हे नवीन दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजेपासून लागू होतात.

आपल्या फोनवरून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे आपण जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑइल एसएमएस सेवेअंतर्गत आपण ९२२४९९२२४९ या मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता. आपला एसएमएस असा असेल, RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलर कोड.