आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाची दरवाढ झाली असल्याची नेहमीची सबब पुढे करुन देशातील तेल कंपन्यांनी एलपीजीपाठोपाठ पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीची नववर्षांची भेट ‘आम आदमी’ला दिली आहे. ही दरवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच अंमलात आली असून त्याद्वारे मुंबईतील ग्राहकांना आता पेट्रोलसाठी प्रति लीटरमागे ७९.५२ रु. तर डिझेलसाठी प्रति लीटरमागे ६१.४२ रु. मोजावे लागणार आहेत. हे वाढीव दर अर्थातच नेहमीप्रमाणे मूल्यवर्धित व अन्य कर वगळून असल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या प्रति लीटर दरामध्ये आणखीही अप्रत्यक्ष वाढ संभवत आहे.

Story img Loader