पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ७० पैशांनी आणि डिझेलच्या प्रतिलिटर ५० पैशांनी वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी बुधवारी घेतला. या निर्णयामुळे आधीच महागाईची झळ सोसत असलेल्या सर्वसामान्यांचा खिसा आणखी रिकामा होणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून नवे दर अंमलात येणार आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे सातत्याने अवमूल्यन होत असल्यामुळे ही दरवाढ करण्याची वेळ इंधन कंपन्यांवर आली आहे. आगामी काळात पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ होणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बॅंकेने मंगळवारी तिमाही पतधोरणाचा आढावा घेताना दिले होते.

Story img Loader