विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात केंद्र सरकारने शुक्रवारी २३ रुपये कपात केली. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे १३वा सिलिंडर तुलनेने स्वस्तात उपलब्ध होणार आहे. गॅस ग्राहकांना वर्षभरात १२ अनुदानित सिलिंडर मिळतात. मात्र, त्यानंतरचा सिलिंडर त्यांना बाजारभावानुसार घ्यावा लागतो. परंतु आता केंद्र सरकारच्या निर्णयानुसार त्यात २३.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.  दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांतही अनुक्रमे दोन रुपये ४३ पैसे व तीन रुपये ६० पैशांनी कपात करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा