रविवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर सोमवारी इंधनाचे दर तेल कंपन्यांनी स्थिर ठेवले आहेत. मात्र असं असलं तरी दिल्ली, मुंबईसहीत अनेक शहरांमध्ये इंधनाच्या दरांनी नवीन उच्चांक गाठले आहेत. स्वयंचलित पेट्रोल-डिझेल हे हवाई इंधनापेक्षा ३० टक्क्यांनी महाग झाले आहे.पेट्रोल-डिझेलच्या दरांत रविवारी सलग चौथ्या दिवशी लिटरमागे ३५ पैशांची वाढ झाल्यामुळे देशभरात हे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत.

मुंबईत दर किती?
मुंबईत प्रति लिटर पेट्रोलसाठी १११.७७ रुपये मोजावे लागत असून, दिल्लीतही हे दर आजवरचे सर्वाधिक, म्हणजे १०५.८४ रुपये इतके झाले आहेत. मुंबईत डिझेलचे दर प्रति लिटर १०२.५२ रुपये असून, दिल्लीत ९४.५७ रुपये आहेत.

विमानाच्या इंधनापेक्षा गाड्यांचं इंधन महाग
हवाई इंधन (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल- एटीएफ) ज्या दरांत विमान वाहतूक कंपन्यांना विकले जाते, त्यापेक्षा दुचाकी आणि मोटारींमध्ये वापरल्या जाणाऱ्या पेट्रोलचे दर आता ३३ टक्क्यांनी अधिक आहेत. दिल्लीत ‘एटीएफ’चे दर एका लिटरला ७९ रुपये इतके आहेत. देशभरातील सर्वात महाग इंधन राजस्थानमधील गंगानगर या सीमेवरील शहरात मिळत असून, तेथे पेट्रोलचे दर लिटरला ११७.८६ रुपये, तर डिझेलचे दर १०५.९५ रुपये आहेत.

जाणून घ्या तुमच्या शहरामधील दर
देशामधील तिन्ही तेल कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी रोज सकाळी सहा वाजता इंधनाच्या नवीन दरांची घोषणा करतात. या नव्या दरांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर मिळते. तर दुसरीकडे फोनवरही एसएमएस करुन नवीन दर तपासण्याची सुविधा देण्यात आलीय. 92249 92249 क्रमांकावर एसएमएस पाठवून पेट्रोल डिझेलच्या नवीन दरांबद्दल माहिती मिळवता येते. RSP < स्पेस > पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 वर पाठवावा.

Story img Loader