देशात शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात दर लिटरमागे ५० पैशांनी घट करण्यात आली असून डिझेलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात येत असल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसार आता दिल्लीत पेट्रोलचे दर एका लिटरमागे पूर्वीच्या ६१.२० रुपयांवरून ६०.७० रुपयांवर येतील. गेल्या १ सप्टेंबरपासून पेट्रोलचे दर प्रथमच बदलत आहेत. तेव्हा पेट्रोलच्या दरात २ रुपयांनी घट झाली होती. डिझेलच्या दरात आता बदल झाला नसला तरी १६ ऑक्टोबरला ९५ पैशांनी तर १ ऑक्टोबरला ५० पैशांनी ते दर वाढवले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेलाच्या किमती आणि रुपयाचा डॉलरशी विनिमय दर यातील बदलांनुसार तेल कंपन्या दर पंधरवडय़ाला देशांतर्गत दरांत बदल करतात.
पेट्रोल ५० पैशांनी स्वस्त; डिझेल स्थिर
देशात शनिवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात दर लिटरमागे ५० पैशांनी घट करण्यात आली
Written by रत्नाकर पवार
Updated:
First published on: 01-11-2015 at 06:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol price reduce