स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या मतदाराला केवळ १०० रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचा मतदान सक्तीचे करण्याचा कायदा करण्याचा प्रस्ताव केवळ क्लृप्ती असल्याचे दिसून येत आहे, असे गुजरात काँग्रेसने म्हटले आहे.
केवळ १०० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेऊन भाजपने निवडणूक सुधारणांबाबत गंभीर नसल्याचे आणि केवळ क्लृप्त्यांवर विश्वास असल्याचे सिद्ध केले आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी म्हटले आहे. सरकारने गेल्या आठवडय़ात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान सक्तीचे केले. दंड वगळता अन्य कोणत्याही शिक्षेची तरतूद त्यामध्ये नाही.
मतदान न करणाऱ्याला क्षुल्लक दंड ; काँग्रेसची टीका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या मतदाराला केवळ १०० रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.
First published on: 09-08-2015 at 12:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petty fine for not voting shows bjp is not serious says congress