स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या मतदाराला केवळ १०० रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचा मतदान सक्तीचे करण्याचा कायदा करण्याचा प्रस्ताव केवळ क्लृप्ती असल्याचे दिसून येत आहे, असे गुजरात काँग्रेसने म्हटले आहे.
केवळ १०० रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेऊन भाजपने निवडणूक सुधारणांबाबत गंभीर नसल्याचे आणि केवळ क्लृप्त्यांवर विश्वास असल्याचे सिद्ध केले आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी म्हटले आहे. सरकारने गेल्या आठवडय़ात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान सक्तीचे केले. दंड वगळता अन्य कोणत्याही शिक्षेची तरतूद त्यामध्ये नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा