एपी, दुबई
इराणमध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुधारणावादी नेते मसूद पेझेश्कियान विजयी झाले असून त्यांनी शनिवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत कट्टर मूलतत्त्ववादी नेते सईद जलिली यांचा पराभव केला. पेझेश्कियान यांनी पाश्चात्त्य देशांशी संबंध सुधारण्याचे तसेच इराणमधील महिलांना केस झाकणे अनिवार्य करणाऱ्या हिजाबसंबंधी कायद्याच्या तरतुदी शिथील करण्याचे आश्वासन दिले आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी इराणी जनतेला एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
इराणमध्ये निवडणुकीच्या पहिल्या फेरीचे मतदान २८ जून रोजी घेण्यात आले होते, त्यामधून चार उमेदवार दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरले होते. दुसऱ्या फेरीचे मतदान शुक्रवारी, ५ जूनला घेण्यात आले. त्यासाठी ३ कोटी मतदारांनी मतदान केले. पेझेश्कियान यांना १.६३ कोटी तर जलिली यांना १.३५ कोटी इतकी मते मिळाली. मतदान संपल्यानंतर शुक्रवारी रात्रीच मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल जाहीर होऊ लागल्यांतर पेझेश्कियान यांच्या समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. पेझेश्कियान हे पेशाने हृदय शल्यविशारद आहेत तर सईद जलिली हे इराणच्या अणुकार्यक्रमासाठी दीर्घकाळ पाश्चात्त्य देशांशी वाटाघाटी करणारे प्रमुख नेते राहिले आहेत. पाश्चात्त्य देशांशी संबंध सुरळीत करणे आणि महिलांवरील हिजाबसारखी बंधने काही प्रमाणात सैल करणे याचा ते पुरस्कार करतात. मात्र त्यालही कट्टरपथींयांचे वर्चस्व असलेल्या इराण सरकारकडून आव्हान दिले जाईल असे मानले जात आहे.
हेही वाचा >>>“अयोध्येप्रमाणे गुजरातमध्येही भाजपाला हरवणार…”, राहुल गांधींचं अहमदाबादमधून थेट मोदींना आव्हान
प्रिय इराणी जनता, ही आपल्या सहकार्याची सुरुवात आहे. तुमची साथ, सहानुभूती आणि विश्वास यांचा अपवाद वगळता पुढील कठीण मार्ग अजिबात सुरळीत असणार नाही. मी तुमच्या दिशेने माझा हात देत आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की तुम्हाला या मार्गावर एकटे सोडणार नाही. तुम्ही मला एकटे सोडू नका.– मसूद पेझेश्कियान, इराणचे नियोजित अध्यक्ष