नवी दिल्ली : न्यायाधीश, पोलीस अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्याचा कट बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने आखल्याचे उघड झाले आहे. गेल्या आठवडय़ाभरात देशभरात टाकलेल्या छाप्यांमध्ये पीएफआयचा ‘२०४७ पर्यंतचा आराखडा’ तपास यंत्रणांच्या हाती आला आहे. त्याआधारे तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रीय तपास संस्थेसह देशभरात स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत पीएफआयशी संबंधित हजारो कागदपत्रे यंत्रणांच्या हाती लागली आहेत. दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमधून पीएफआयचा व्यापक कट उघड झाला आहे. ‘देशविघातक कामांसाठी तरुणांची भरती करण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर ‘पीएफआय’कडून केला जात होता. न्यायाधीश, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह अहमदीया पंथाच्या मुस्लिमांना लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती. तसेच तामिळनाडूतील वत्तकानल या थंड हवेच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर जाणारे ज्यू पर्यटकही संघटनेच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे.

Story img Loader