फिलिपिन्समध्ये लष्करी विमान सी-१३० आग लागल्याने कोसळलं. या दुर्घटनेत २९ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जवानांना वाचवण्यात यश आलं आहे. या विमानात एकूण ९२ जवान होते. या विमानानं कागायन डी ओरो सिटीमधून उड्डाण घेतलं होतं. सुलुतील जोलो बेटावर या विमानाचं लँडिग करताना हा अपघात घडला. अजूनही काही जवान विमानाच्या ढिगाऱ्याखाली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्घटनाग्रस्त विमानातून जवानांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. वाचवण्यात आलेले जवान गंभीररित्या जखमी असल्याचं सांगण्यात आलं आहे.

फिलिपिन्समधील दक्षिण कागायान डी ओरो शहरातून लष्करी विमान जवानांना नेत होतं. विमान सुलुतील जोलो बेटावर उतरत असताना हा अपघात झाला. विमानाला आग लागल्याने धावपट्टीवरचा वैमानिकाचा अंदाज चुकाला आणि अपघात झाला. “दुर्घटना होणार असल्याचा अंदाज आल्याने बहुतेक जवानांनी विमानातून उड्या घेतल्या. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र त्यांना गंभीर दुखापत झाली आहे”, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

धक्कादायक: पाच वर्षांची मुलगी होणार दगड!; दुर्मिळ आजारानं ग्रासलं

सुलुतील मुस्लिम बहुल भागातील अबू सय्याफ या बंडखोर संघटनेशी लष्कर गेल्या काही दशकांपासून सामना करत आहे. सध्या तरी विमानावर हल्ला केल्याचं कोणतंच वृत्त नही. मात्र दुर्घटनेचा तपास केला जात आहे.

Story img Loader