पतियाळा न्यायालयाच्या आवारात उन्मादी वकिलांच्या गटाने विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला केलेली मारहाण ही पूर्वनियोजित होती, असा दावा राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडून (एनएचआरसी) करण्यात आला आहे. कन्हैया कुमारने आत्तापर्यंत शारीरिक छळवणुकीची तक्रार दाखल केली नसली तरी चौकशीदरम्यान त्याचा मानसिक केला जात असल्याचा आरोप मानवधिकार आयोगाने केला आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वी कन्हैयाच्यावतीने जारी करण्यात विनंती निवेदन हे पोलिसांनी त्याच्याकडून बळजबरीने वदवून घेतले होते. १७ फेब्रुवारीला पतियाळा न्यायालयाच्या आवारात कन्हैयावर झालेला हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि कर्तव्यातील अक्षम्य हलगर्जीपणा होता. सध्या ज्या पद्धतीच्या घडामोडी सुरू आहेत त्यावरून कन्हैया आणि त्याच्या कुटुंबियांची सुरक्षा हा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे मानवधिकार आयोगाच्या अहवालात म्हटले आहे.

Story img Loader