मणिपूर येथील इन्फाळमधील एका गावात अपंग महिलेवर तिच्या मेहुण्यानेच बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत महिला २२ वर्षीय असून लईशराम जॉय कुमार(४१) याने तिच्या मेहुण्याने घरात कोणी नसल्याचा डाव साधून बलात्कार केला. त्यानंतर पीडीत महिलेने पोलिसात तक्रार केली. पडित महिलेला तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच तपासणी नंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार नराधम मेहुण्याला पोलिसांनी अटक केली करण्यात आली आहे आणि बलात्काराच्या आरोपाखाली त्याच्यावर पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.