पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इमरान खानची आधीची पत्नी रेहम खान हिला विमानाच्या कॉकपिटमध्ये बसविल्याने संबंधित वैमानिक अडचणीत सापडला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने या वैमानिकाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लंडन ते लाहोर प्रवासादरम्यान नियमांचे उल्लंघन करत रेहमला कॉकपिटमध्ये बसविल्याचा आरोप या पायलटवर आहे. रेहमने काही काळासाठी पीके-७८८ विमानाच्या कॉकपिटमध्ये प्रवेश केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पाकिस्तान एअरलाइन्सचे प्रवक्ते डॅनियल गिलानी यांनी सांगितले. रेहमच्या विनंतीवरून तिला कॉकपिटमध्ये बसविण्यात आल्याचे पायलटनेदेखील मान्य केले असून, असे करणे एअरलाइन्सच्या नियमांविरुद्ध असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाच्या तपासाचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगत, पायलट दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. रेहम कॉकपिटमध्ये बसल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने पीआयएला या पायलटविरुद्ध कारवाई करावी लागल्याचे सूत्रांकडून समजते.
इमरान खानची पूर्वीची पत्नी रेहमला कॉकपिटमध्ये बसविल्याने वैमानिक अडचणीत
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने या वैमानिकाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Written by दीपक मराठे
Updated:
First published on: 04-12-2015 at 18:36 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pia pilot allows imran khans ex wife reham to sit in cockpit faces probe