राजकीय फायद्याच्या दृष्टीने आम आदमी पक्षाने राष्ट्रध्वजाचा वापर केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल, मयंक गांधी आणि अंजली दमानिया यांच्याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिकाकर्ते राम समुद्रे यांच्या दाव्यानुसार, आम आदमी पक्ष आपल्या संकेतस्थळावर तसेच राजकीय प्रचारात राष्ट्रध्वजाचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करत आहेत. राजकीय प्रचारात राष्ट्रध्वजाचा वापर करण्याची परवानगी कोणत्याही पक्षाला नाही. तरीसुद्धा आम आदमी पक्षाने आपल्या प्रचारात राष्ट्रध्वजाचा वापर केला त्यामुळे पक्षावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे राम समुद्रे यांनी आपल्या याचिकेत नमूद केले आहे.
या याचिकेवर न्यायाधीश मोहीत शहा आणि एम एस संकलेचा खंडपीठाकडून येत्या १२ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला राष्ट्रध्वजाचा किंवा चिन्हाचा राजकीय प्रचारात वापर करण्याची परवानगी नसल्याने आम आदमी पक्षावर कारवाई होण्याचेही संकेत आहेत.  

Story img Loader