सुशांतसिंह राजपूत आणि सारा अली खान अभिनित केदारनाथ या चित्रपटाविरोधात धार्मिक भावना दुखावण्यात आल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेली जनहित याचिका गुरुवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे उद्या (दि.७) प्रदर्शित होण्याचा  या चित्रपटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केदारनाथ चित्रपटाविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका राजकीय हेतूने प्रभावित असल्याचे केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र बोर्डाने (सीबीएफसी) अर्थात सेन्सॉर बोर्डाने म्हटले आहे.

त्याचबरोबर केदारनाथ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी गढवाल येथील स्वामी दर्शन भारती यांनी उत्तराखंड हायकोर्टात दाखल केली होती. यावर कोर्टाने भारती यांनी रुद्रप्रयागच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली तक्रार घेऊन जावं असा सल्ला दिला होता. दरम्यान, जर या चित्रपटामध्ये २०१३ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ भागात आलेल्या भीषण पुरातील पीडितांविरोधातील आणि हिंदूंच्या भावना दुखावणारे चित्रण असेल तर बंदी आणण्यात येईल, असे मुख्य न्यायाधीश रमेश रंगनाथन यांनी म्हटले होते. या चित्रपटात लव्ह-जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

केदारनाथमधून सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. अभिषेक कपूरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सवर्ण समाजातील हिंदू मुलगी एका गरीब मुस्लिम टुरिस्ट गाईडच्या प्रेमात पडते, असे याचे कथानक आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pil filed against the film kedarnath for allegedly hurting religious sentiments has been dismissed by bombay high court