चिनी एअरलाइन्सचा एक वैमानिक विमान हवेत असताना चक्क झोपला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होतो आहे. वैमानिक झोपी गेल्याचा हा तीस सेकंदाचा व्हिडिओ आहे. बोइंग 747 च्या कॉकपिटमध्ये वैमानिक आरामत झोपी गेल्याचे या व्हिडिओत दिसते आहे. वेंग जियाकी असं या वैमानिकाचं नाव असल्याचीही माहिती समोर आली आहे. चिनी एअरलाइन्सने ही माहिती दिली आहे. हा वैमानिक तैवानचा रहिवासी आहे.
मागील 20 वर्षांपासून वेंग हा वैमानिक म्हणून काम करतो. एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर आठवडाभराने हे प्रकरण समोर आले आहे. गेल्या काही दिवसातलाच हा व्हिडिओ आहे असंही सांगण्यात येतं आहे.
पहा व्हिडिओ
आम्ही कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन करणार नाही असं चिनी एअरलाइन्सनं म्हटलं आहे. या वैमानिकाला टोकियो, ओकिनावा, सियोल आणि हाँगकाँग या ठिकाणी विमान उड्डाणाचा अनुभव आहे. हा वैमानिक चायना एअरलाइन्सच्या फ्लाइट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रभारी शिक्षकही आहे. असं असलं तरीही आमच्यासाठी प्रवाशांची सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे. आम्ही हा निष्काळजीपणा मुळीच खपवून घेणार नाही असं एअरलाइन्सनं म्हटलं आहे. एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार या वैमानिकाने त्याची चूक मान्य केली आहे. मी खूप थकलो होतो म्हणून मला झोप लागली होती असंही या वैमानिकाने सांगितलं आहे.