उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका २४ वर्षीय तरुणीने ३१ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणीचं नाव पिंकी गुप्ता असून तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत पीडितेने तिच्या लिव्ह-इन पार्टनरवर आरोप केले आहेत.
‘फ्री प्रेस जर्नल’ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत पिंकी गुप्ता आणि आरोपी शाकीब अली यांची चार वर्षांपूर्वी एका जिममध्ये ओळख झाली होती. संबंधित जिममध्ये ती रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. शाकीबही त्याच जिममध्ये काम करायचा. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर दोघंही वैशाली परिसरात एका फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. पिंकी गेल्या चार वर्षांपासून तिचं घर सोडून शाकीबबरोबर राहत होती.
हेही वाचा- संतापजनक: लेकानं जन्मदात्या आईला रस्त्यावरून नेलं फरपटत, हृदय पिळवटून टाकणारा VIDEO
अलीकडच्या काळात पिंकी शाकीबवर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती. पण शाकीबला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं. शिवाय आरोपीचं आधीच लग्न झाल्याची माहिती पिंकीला मिळाली. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यानंतर पिंकी गुप्ताने ३१ ऑगस्ट रोजी आपल्या राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. घटनेच्या रात्री दोघांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर शाकीब घरापासून काही अंतरावर चालण्यासाठी गेला. काही वेळातच त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला फोन करून पिंकीने गळफास घेतल्याची माहिती दिली.
हेही वाचा- दहावीच्या विद्यार्थिनीनं अकराव्या मजल्यावरून मारली उडी, उच्चभ्रू सोसायटीतील घटना
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना एक डायरी आणि फोन सापडला आहे. एसीपी स्वतंत्र कुमार सिंह यांनी स्थानिक मीडियाला सांगितलं की, पिंकी गुप्ता २०१८ पासून डायरी लिहित होती. ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
हेही वाचा- धक्कादायक! सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, पीडितेचा मृत्यू
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
पिंकीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, मलाच माझी लाज वाटते. मी तुझ्यासाठी तुझ्याशी भांडत होते. सर्वांनी मला याबाबत समजावण्याचा प्रयत्न केला. पण मला तुझ्यासमोर काहीच दिसत नव्हतं. मी माझा धर्म बदलण्याचाही विचार केला. मी तुझ्यासाठी सर्वकाही स्वीकारण्याचा विचार केला. मला वाटायचं की काहीही झालं तरी हा माणूस (शाकीब) माझा झाला पाहिजे. परंतु तुला समजलं नाही. मी आता हे सर्व सहन करू शकत नाही… गुडबाय शाकीब.