राज्यसभेमध्ये काँग्रेसच्या खासदार कुमारी शैलजा यांच्या भाषणातील एका मुद्द्यावर वादग्रस्त टिप्पणी करणारे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियूष गोयन यांनी गुरुवारी सभागृहामध्ये आपले विधान मागे घेत घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, कुमारी शैलजा यांनी आपल्या भाषणात उपस्थित केलेला तो मुद्दा राज्यसभेच्या अध्यक्षांनी कामकाजातून वगळावा, अशी मागणी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली. त्यावरून कुमारी शैलजा यांच्यासह काँग्रेसचे इतर सदस्य आक्रमक झाले आणि त्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणाबाजी केली. यामुळे राज्यसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
गुजरातमधील द्वारका मंदिरात जात विचारल्याचे अनुभवकथन करणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा ‘निर्मित भेदभावा’चा प्रसंग सांगत असल्याचे धक्कादायक विधान गोयल यांनी केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस खासदारांनी गोयल यांच्या माफीनाम्याची मागणी केली. त्यावरूनच पियूष गोयल यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराचा तास सुरू होण्यापूर्वी आपले विधान मागे घेत असल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा