चीनमधील एका विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. १३३ प्रवाशांना घेऊन जाणारे एक चायना इस्टर्न पॅसेंजर जेट चीनच्या नैऋत्य भागामध्ये क्रॅश झाले आहे. दरम्यान, मृतांची आकडेवारी अद्याप कळू शकलेली नाही, अशी माहिती राज्य प्रसारक सीसीटीव्हीने सोमवारी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोईंग ७३७ विमान वुझोउ शहर, गुआंग्शी प्रदेशाजवळील ग्रामीण भागात क्रॅश झाले आणि त्याला आग लागली. घटनास्थळी बचाव पथके पाठवण्यात आली आहेत, असंही सीसीटीव्हीने सांगितलंय.

कुनमिंगहून ग्वांगझूला १३३ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चायना इस्टर्न एअरलाइन्सच्या विमानाचा गुआंग्शी प्रदेशात अपघात झाला आणि आग लागली. अपघात झालेले जेट हे बोईंग ७३७ विमान होते आणि मृतांची संख्या अद्याप कळू शकलेली नाही, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.