नेपाळमध्ये बुधवारी सकाळी उड्डाणानंतर २३ प्रवाशांसह बेपत्ता झालेले विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनाग्रस्त विमानाचे अवशेष नेपाळमध्ये सापडले असून विमानातील २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नेपाळच्या पर्यटनमंत्र्यांनी दिली. प्रवाशांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. उड्डाणावेळी अंधुक प्रकाश असल्यामुळे पर्वतरांगांमध्ये हे विमान बेपत्ता झाले होते, त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतो आहे. तारा एअर या खासगी कंपनीचे हे विमान पोखरा ते जॉमसम या २० मिनिटांच्या प्रवासासाठी निघाले होते. नेपाळमधील प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसात वाजता या विमानाने पोखरामधून उड्डाण केले. त्यानंतर काही मिनिटांतच विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानामध्ये एकूण २० प्रवासी आणि तीन कर्मचारी होती. प्रवाशांमध्ये दोन परदेशी प्रवासी आणि दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 24th Feb 2016 रोजी प्रकाशित
नेपाळमधील बेपत्ता झालेले विमान कोसळल्याचे स्पष्ट; सर्व प्रवाशांचा मृत्यू
पाळमधील पर्वतरांगांमध्ये हे विमान बेपत्ता झाले असून, त्याचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येतो आहे.
Written by वृत्तसंस्था
Updated:
First published on: 24-02-2016 at 10:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Plane goes missing in nepal with 23 people on board