प्रज्ञा तळेगावकर, लोकसत्ता

गुवाहाटी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील महानाटय़ ‘जाणता राजा’ प्रमाणेच आसाममधील योद्धे लचित बरफुकन यांचे चरित्र आणि इतिहास जगासमोर आणण्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘जाणता राजा’ या नाटकाचे प्रयोग आसाममध्ये करण्यात येणार असल्याचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले.

Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
article 371 special provisions
संविधानभान : विशेष तरतुदी; सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल
The direction of Maharashtra integrated development is communal harmony
लेख: महाराष्ट्राच्या ‘एकात्म’ विकासाची दिशा
contempt of court notice marathi news
नागपूर : मंत्र्याच्या सूचनेचे पालन करणे जिल्हाधिकाऱ्यांना भोवले, न्यायालयाचा आदेश धुडकावल्यामुळे…
Sanjay Shirsat Eknath Shinde
“आम्हाला मध्येच डच्चू मिळू शकतो”, संजय शिरसाटांनी सांगितला एकनाथ शिंदेंनी नवनिर्वाचित मंत्र्यांना दिलेला संदेश
List of Ministers in Maharashtra 2024 Shivsena Party
फडणवीसांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेचे किती मंत्री? वाचा संपूर्ण यादी
maharashtra cabinet expansion three ministers including cm belong to nagpur seven from Vidarbha get ministry portfolio
Maharashtra Cabinet Expansion : नागपूरला मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री, विदर्भातून सात जणांना लालदिवा

पत्रसूचना कार्यालयाने अर्थात पीआयबीने महाराष्ट्रातील काही पत्रकारांचा आसाम आणि मेघालय या राज्यांचा अभ्यासदौरा आयोजित केला होता. या दौऱ्यात पत्रकारांनी गुवाहाटी येथे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री सरमा यांनी ही माहिती दिली.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचे चरित्र यांचा परिचय जगभरात सर्वांना आहे. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे मुघलांचे आक्रमण परतवून लावले त्याचप्रमाणे आसाममध्येही योद्धा लचित बरफुकन यांनी मुघलांशी लढा दिला. लचित यांचा इतिहास, पराक्रम याचा परिचय मात्र आसाम पुरताच मर्यादित राहिला आहे. त्यांच्याही चरित्राचा परिचय भारताला व्हावा यासाठी शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ नाटकाप्रमाणेच त्यांच्या चरित्रावरही नाटय़प्रयोग केले जावेत, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यांच्या सूचनेप्रमाणे आसाममधील नाटककारांना लचित बरफुकन यांच्या चरित्रावर नाटक सादर करण्याचा अनुभव मिळावा, यासाठी आसाममध्ये सर्वत्र ‘जाणता राजा’चे प्रयोग करण्यात येणार आहेत, अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली.

हेही वाचा >>> VIDEO : “भूपेश बघेल भाजपात गेले, तर ‘महादेव’ बेटिंग अ‍ॅपचे…”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आसाममधील आरोग्य, पर्यटन क्षेत्रातील विकासाचीही त्यांनी यावेळी माहिती दिली. २०२६ पर्यंत आसाममधील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत १६ वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईमध्ये कामाख्या देवीचे मंदिर उभारणार

महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने मुंबईत मोठय़ा प्रमाणात आसाममधील नागरिक राहतात. त्यांच्यासाठी तसेच महाराष्ट्रातील कामाख्या देवीच्या भाविकांसाठी मुंबईमध्ये कामाख्या देवीचे मंदिर आणि नामघर उभारण्यात येणार असून त्यासाठी जमिनीचा शोध सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही सरमा यांनी सांगितले. आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला आहे, लवकरच आसाममध्ये महाराष्ट्र सदन उभारले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मणिपूरमध्ये स्थिती सामान्य

ईशान्य भारतातील राज्यांपैकी मणिपूर आणि नागालँड वगळता इतर राज्यांमध्ये कुठेही संघर्ष नाही. तेथील जनजीवन सुरळीत आहे. मणिपूरमध्येही सध्या तणाव असला तरी तेथील स्थिती सामान्य होत आहे. मणिपूरमधला संघर्ष हा तेथील दोन समुदायातला असून त्याच्यावर त्या दोन समुदायांनाच प्रयत्नपूर्वक तोडगा काढावा लागेल. त्यात राज्य अथवा केंद्र सरकार ठरावीक मर्यादेनंतर हस्तक्षेप करू शकत नाही, असेही सरमा यांनी स्पष्ट केले.

Story img Loader