दिल्ली सामूहिक बलात्कार घटनेवर नाट्य तयार करण्यात आले असून दक्षिण आफ्रिकेतील नाटककार आणि दिग्दर्शक येल फार्बर या नाटकाची निर्मिती करत आहे. सदर नाट्याचा पुढील महिन्यात एडिनबर्ग उत्सवात जागतिक प्रयोग दाखविण्यात येणार आहे. डिसेंबर २०१२मध्ये दिल्लीत भौतिक चिकित्सेच्या विद्यार्थिनीवर सहा जणांनी मिळून अतिशय क्रूरपणे बसमध्ये बलात्कार केला होता. यावर नाट्याची कथा आधारित आहे. नाटक कलाकार आणि बॉलीवूड व भारतीय मालिकांमध्ये काम करत असलेल्या रुष्कर कबीर, प्रियांका बोस आणि पूर्ना जगन्नाथन यांनी सदर नाटकाची कल्पना फार्बर हिला दिली.

Story img Loader