Playing Video Games Now Classified As Serious Mental Health Issue by WHO: जर तुमची मुले व्हिडीओ गेम्सच्या किंवा मोबाईलसारख्या डिजीटल उपकरणांवरील गेम्सच्या आहारी गेली असतील तर योग्य वेळी त्यांना थांबवण्याची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHOने) रोगांच्या आंतरराष्ट्रीय वर्गीकरणाच्या यादीमध्ये म्हणजेच आयसीडी यादीमध्ये व्हिडीओ तसेच डिजीटल गेम्सच्या आहारी जाण्याच्या समस्येचा समावेश केला आहे. डिजिटल आणि व्हिडीओ गेम्सच्या आहारी जाणे हा मानसिक आजार असून अशा प्रकारच्या व्यक्तींना मनोरुग्न म्हणू शकतो असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

डिसेंबरमध्ये २०१७ च्या सुरुवातला आलेल्या ‘न्यू सायटिस्ट’ या अहवालामध्ये जागतिक आरोग्य संघटना गेमच्या व्यसनाला आयसीडीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर आज सहा महिन्यांनी म्हणजेच जून २०१८ मध्ये गेमच्या व्यसनाला मानसिक आजार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

गेम्सच्या आहारी गेल्याने ही कामे होत नाहीत

WHO च्या म्हणण्यानुसार गेमचे व्यसन असणारे लोकं त्या गेममध्ये इतके गुंतून जातात की ते लोक दैनंदिन जिवनातील अनेक आवश्यक कामे करतच नाहीत. त्यांचे संपूर्ण लक्ष गेममध्ये असते. गेमिंगचा आजारांच्या यादीत समावेश करण्यामागे आरोग्य जपण्याबरोबरच गेमिंगशीसंबंधीत इतर संबंधित यंत्रणांनाही याबद्दल सावाध करण्याचा WHO चा हेतू आहे. यामुळे गेमिंगच्या आहारी गेलेल्यांना कोणत्या त्रासातून जावे लागत आहे याची जाणीव होऊन त्यांना लवकरात लवकर मदत पोहचवण्याची गरज असल्याचे WHOचे म्हणणे आहे.

गेमिंगचा आजार होण्यामागील तीन मुख्य लक्षणे

१)
गेमिंगला एवढा महत्व दिले जाते की इतर सर्व कामांकडे दूर्लक्ष केले जाते. आणि मग ती कामे तशीच पडून राहतात.
२)
गेमिंगमुळे एवढा ताण येतो की ज्यामुळे खाजगी, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनावर परिणाम होतो
३)
गेमिंगच्या व्यसनामुळे झोप कमी होणे, जेवण कमी जाणे आणि शारिरिक हलचाली मंदावण्यास सुरुवात होते

डिजीटल डिटॉक्सची गरज

डिजीटल डिटॉक्स म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर डिजीटल सन्यास. मानसोपचारतज्ञांच्या मते गेमिंगच्या आजारापासून वाचण्याासाठी सर्वोत्तम गोष्ट म्हणजे डिजीटल डिटॉक्स, इलेक्ट्रीक उपकरणांवर जास्त वेळ जात असल्याने लोकांमधील खाजगी संवाद अगदीच कमी झाले आहेत. प्रत्येकजण आपल्या व्हर्च्यूअल जगात व्यस्त आहे. त्यामुळे लहान मुले आणि मोठ्यांमधील संवाद खुंटला आहे. म्हणूनच डिजीटल डिटॉक्सच्या माध्यमातून उपकरणे दूर सारून माणसांच्या जवळ जाण्याचा संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा.

आयसीडीची बारावी यादी

आय़सीडी म्हणजे WHO कडून प्रसिद्ध होणारी एक औपचारिक यादी. ही यादी पहिल्यांदा २८ वर्षांपूर्वी १९९० साली अपडेट करण्यात आले होते. आणि नुकतीच ही यादी अकराव्यांदा अपडेट करण्यात आली. यामध्येच गेमिंगला मानसिक आजार असल्याचे WHOने म्हटलं आहे. गेमिंग संदर्भातील अनेक निरिक्षणांची यामध्ये नोंद असून त्या नोंदीच्या आधारे एखादी व्यक्ती गेमिंगच्या किती आहारी गेली आहे याचा अंदाज बांधणे शक्य होणार आहे.

Story img Loader