चार वर्षांपूर्वी मनमोहन सिंग सरकारवरील लोकसभेतील विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या ३९ खासदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी पंतप्रधानांच्या कार्यालयाचे तत्कालीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सीबीआयचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका मंगळवारी तीस हजारी न्यायालयाच्या न्यायमूर्ती संगीता धिंग्रा सहगल यांनी फेटाळून लावली.याचिकाकर्ते विश्वनाथ चतुर्वेदी यांच्या अर्जाची दखल घेत न्या. िधग्रा-सहगल यांच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणी स्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या अहवालावर दुपारी युक्तिवादाची वेळ निश्चित करण्यात आली. पण अहवालावर युक्तिवाद न होताच न्या. िधग्रा-सहगल यांनी ही याचिका फेटाळून लावली.

Story img Loader