माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या ही ‘ठरवून केलेली आत्महत्या’ असल्याचा दावा करणारी याचिका गुजरात उच्च न्यायालयात १९८६ मध्ये दाखल करण्यात आली होती. यावर तब्बल २९ वर्षांनी सोमवारी पहिली सुनावणी झाली. पहिल्याच दिवशी ही याचिका न्यायालयाने रद्द केली.
इंदिरा गांधी यांनी आपला पुत्र राजीव गांधी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी ठरवून आत्महत्या केली. १९८४ मध्ये राजीव गांधी या लाटेवरच पंतप्रधान बनल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला होता.
ही याचिका नवनीतलाल शाह यांनी दाखल केली होती. यावर प्रथमच सुनावणी करताना गुजरात उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने इंदिरा गांधी यांची हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्याने ही याचिका फेटाळण्यात येत असल्याचा निर्णय दिला.
आणखी वाचा