नोबेल पारितोषिक विजेत्या मदर तेरेसा यांच्याविरूध्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर चांगलीच खळबळ माजली आहे. समाजातील सर्व स्तरांतून या विधानाचा निषेध होत असताना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत निषेध नोंदवला आहे.

मदर तेरेसा यांच्या सेवाकार्यामागे धर्मांतरणाचा उद्देश- मोहन भागवत 

केजरीवाल यांनी मंगळवारी सकाळी केलेल्या टि्वटमध्ये म्हटले आहे की, मी मदर तेरेसा यांच्यासोबत कोलकाता येथील निर्मल ह्रदय आश्रमात काम केले आहे. त्या अतिशय थोर आत्मा होत्या. कृपया त्यांना दुखवू नका.

मदर तेरेसा यांच्या सेवाभावी कार्यामागे इतरधर्मीय लोकांचे धर्मांतरण करून त्यांना ख्रिश्चन धर्मात सामावून घेण्याचा मुख्य उद्देश असल्याचे, खळबळजनक विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते सोमवारी भरतपूर येथे ‘अपना घर’ या ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

Story img Loader