येत्या १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सार्वमतादरम्यान जर स्कॉटलंडवासीयांनी स्वातंत्र्याच्या पारडय़ात आपले मत टाकले तर ते ‘तात्पुरत्या स्वरूपाचे विभक्त होणे’ न ठरता ‘वेदनादायी घटस्फोट ठरेल, असे भावपूर्ण उद्गार ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी काढले. या निर्णयानंतर परतीचा मार्ग नाही, त्यामुळे हा घटस्फोट टाळा, असे आवाहनही कॅमेरून यांनी केले. लंडनमध्ये ‘आमचे तुमच्यावर प्रेम आहे, आम्हाला सोडून जाऊ नका’, असे फलक घेत लोकांनी स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याविरोधात मोर्चे काढले, तर स्कॉटलंडमध्ये मात्र स्वातंत्र्यवाद्यांनी मिरवणुका काढल्या. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अखंड ब्रिटनचे समर्थन केले.
एकीकडे ब्रिटनचे आर्थिक आणि सामरिक हितसंबंध, दुसरीकडे शासकीय तिजोरीतील वाढती खळ या पाश्र्वभूमीवर ब्रिटनमधील कॅमेरून सरकारचा स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यास विरोध आहे. ब्रिटनच्या राणीनेही ‘विचारपूर्वक मतदान करा’ असे आवाहन स्कॉटलंडमधील मतदारांना केले आहे. स्कॉटलंडच्या दौऱ्यावर गेलेले ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून यांनीही सार्वमत अवघ्या ४८ तासांवर आले असताना स्कॉटलंडवासीयांना भावपूर्ण आवाहन करीत ‘हा घटस्फोट टाळा’ असे सुचविले.
लंडनमध्ये आर्जवी मोर्चे
येथील ऐतिहासिक ट्राफलगार चौकात हजारो ब्रिटिश नागरिक मंगळवारी एकत्र झाले होते. स्कॉटलंडच्या जनतेने स्वातंत्र्याऐवजी ब्रिटनबरोबरच राहावे, असे आवाहन या नागरिकांनी केले. ‘आमचे तुमच्यावर प्रेम आहे, तुम्ही विभक्त होऊ नका’ या आर्जवासाठी लंडन शहरात मोर्चे काढण्यात आले. ३०७ वर्षांचे सहजीवन आम्हाला यापुढेही हवे आहे, अशी मागणी करीत हजारो लंडनवासीय भावुक झाले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा