PM Care Fund : कोरोनाच्या काळात नागरिकांना तातडीने सोयी-सुविधा मिळाव्या यासाठी पीएम केअर फंडाची सुरुवात करण्यात आली होती. २०२० मध्ये हा पीएम केअर फंड (PM Care Fund) सुरु करण्यात आला होता. त्यानंतर २०१९-२० ते २०२१-२२ या कालावधीत देखील या फंडात सरकारी आणि खासगी कंपन्यांनी भरभरुन मदत केली. पीएम केअर्स फंडासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षातही तब्बल ९१२ कोटी रुपये मिळाले आहेत, म्हणजे कोरोना महामारीनंतरही पीएम केअर्स फंडसाठी देणग्यांचा ओघ सुरूच असल्याचं यावरून दिसून येत आहे.

पीएम केअर फंडसाठी २०२२-२३ या दरम्यान ऐच्छिक योगदान म्हणून ९०९.६४ कोटी रुपये आणि परदेशी योगदान म्हणून २.५७ कोटी रुपये मिळाले आहेत. ९१२ कोटी रुपयांच्या देणग्यांव्यतिरिक्त पीएम केअर फंडाला व्याज उत्पन्न म्हणून १७०.३८ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यापैकी १५४ कोटी नियमित खात्यांवरील व्याज आणि १६.०७ कोटी विदेशी खात्यातून मिळालेले आहेत. केंद्र व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी चालवल्या जाणाऱ्या सरकारी रुग्णालयांना ५०,००० मेड इन इंडिया व्हेंटिलेटरच्या खरेदीतून परतावा आणि २०२ कोटींसह विविध स्त्रोतांकडून सुमारे २२५ कोटी रुपये परताव्याच्या स्वरूपात मिळाले आहेत.यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
manmohan singh last rites
Manmohan Singh Demise: डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतिस्थळावरून राजकीय वाद, जागेसाठी केंद्राचा होकार, पण अंत्यसंस्कार निगमबोध घाटावरच होणार!
Man Travelled Hanging Under Train
Madhya Pradesh : धक्कादायक! रेल्वेखाली चाकांजवळ लटकून तरुणाचा तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास; Video व्हायरल
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Anjali Damania on Santosh Deshmukh Murder Case
Anjali Damania: “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कधीच सापडणार नाहीत, कारण त्यांचा…”, अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
badlapur sexual assault case
Badlapur Sexual Assault Case: बदलापूर पुन्हा हादरलं! मैत्रिणीने मद्य पाजले, मग रिक्षाचालकाने केला तरूणीवर लैंगिक अत्याचार
Former Prime Minister of India Manmohan Singh
अग्रलेख: मार्दवी मार्तंड!

हेही वाचा : माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा यांची केंद्राकडे सुरक्षेची मागणी; ‘मुदा’ घोटाळा प्रकरण; पंतप्रधान, गृहमंत्र्यांना पत्र

देयके आणि वितरणाबाबत पीएम केअर फंडाने २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण ४३९ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. मुलांसाठी पीएम केअरवर ३४६ कोटी रुपये तर ९९,९८६ ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरच्या खरेदीसाठी ९१.८७ कोटी रुपये तर कायदेशीर प्रक्रियासाठी २४,००० रुपये. तसेच आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या अखेरीस पीएम केअर्स फंडातील क्लोजिंग बॅलन्स ६,२८४ कोटी रुपये होते. जे २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ५,४१६ कोटी रुपयांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी जास्त होते. २०२२-२१ च्या शेवटी ७,०१४ कोटी रुपये आणि २०१९-२० च्या अखेरीस ३,०७७ कोटी रुपये शिल्लक राहिले होते. एकूण २०१९-२० ते २०२२-२३ या चार वर्षांत पीएम केअर फंडाला एकूण १३,६०५ कोटी रुपये मिळाले. ऐच्छिक योगदान १३,०६७ कोटी आणि परदेशी योगदान ५३८ कोटी रुपये आणि या कालावधीत व्याज उत्पन्न म्हणून ५६५ कोटी रुपये मिळाले.

दरम्यान, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन झाल्यानंतर २७ मार्च २०२० रोजी पीएम केअर फंडाची नोंदणी कायदा १९०८ अंतर्गत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट म्हणून नोंदणी करण्यात आली. कोरोना साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या कोणत्याही आपत्कालीन किंवा संकटाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि बाधितांना दिलासा देण्याच्या प्राथमिक उद्देशाने समर्पित निधी असण्याची गरज लक्षात घेऊन पीएम केअर फंडाची स्थापना करण्यात आली होती. तसेच पंतप्रधान हे पीएम केअर फंडाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. तसेच संरक्षण मंत्री, गृहमंत्री आणि वित्त मंत्री हे या निधीचे पदसिद्ध विश्वस्त आहेत. पंतप्रधान, पीएम केअर्स फंडाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती के टी थॉमस (निवृत्त) आणि कारिया मुंडा यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती केली आहे.

Story img Loader