पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले अभिनेते आहेत. पण प्रत्येकवेळी अभिनय चालतोच असे नाही, या शब्दांत आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी मोदी यांना खडे बोल सुनावले. काही दिवसांपूर्वी आसाम दौऱ्यावर असताना मोदी यांनी तेथील काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्याला गोगोई यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, आसाममध्ये कसलाच विकास झाला नाही, असे सांगत मोदी देशातील जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत. त्यांनी कोणतेही भाष्य करण्यापूर्वी आधी पुरावे तपासले पाहिजेत. ते चांगले अभिनेते आहेत पण प्रत्येकवेळी अभिनय चालतोच असे नाही. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने केंद्र सरकारकडे असलेले रेकॉर्ड तपासून मगच बोलले पाहिजे, असेही गोगोई म्हणाले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in

First published on: 22-01-2016 at 12:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm good actor but it wont work in assam tarun gogoi