पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यांनी त्यांच्या सरकारवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आज देशातील जनतेला संबोधित केले. यावेळी इम्रान खान यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर निशाणा साधला. नवाझ शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुपचूप भेटत असत, असाही गंभीर आरोप त्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमुळे इम्रान खान यांच्या भाषणाला उशीर झाला. पाकिस्तानच्या जनतेला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, “आज देशासाठी निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मी भाग्यवान आहे की अल्लाहने मला – प्रसिद्धी, संपत्ती, सर्वकाही सर्व काही दिले आहे. मला आज कशाचीही गरज नाही, त्याने मला सर्व काही दिले ज्यासाठी, मी खूप आभारी आहे. पाकिस्तान माझ्यापेक्षा फक्त ५ वर्षांनी मोठा आहे, मी देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पहिल्या पिढीतील व्यक्ती आहे.”

राष्ट्राला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, “मुशर्रफ यांची सर्वात मोठी चूक म्हणजे अमेरिकेचा वकिली आहे. मी मुक्त परराष्ट्र धोरणाचा समर्थक आहे. आमचे परराष्ट्र धोरण पाकिस्तानी लोकांसाठी आहे. मला भारत किंवा इतर कोणाचा विरोध नको आहे. पाकिस्तानने अमेरिकेशी युद्ध केले आणि त्यांनीच निर्बंध लादले. मी कधीही झुकणार नाही आणि माझ्या समाजालाही झुकू देणार नाही. आपला देश दहशतवादाच्या विरोधात आहे,” असा दावा इम्रान खान यांनी केला.

इम्रान खान म्हणाले, “८ मार्चला, आम्हाला परदेशातून मेसेज आला की ते पाकिस्तानवर नाराज का आहेत. त्यांनी म्हटलं की इम्रान खान यांना हटवल्यास पाकिस्तानला माफ केले जाईल. मात्र तसे झाले नाही तर पाकिस्तानला कठीण प्रसंगाला तोंड द्यावं लागेल. पण रविवारी पाकिस्तानचा निर्णय होईल. मला कोणीतरी राजीनामा देण्यास सांगितलंय. जे माझ्यासोबत क्रिकेट खेळायचे त्यांनी मला शेवटच्या चेंडूपर्यंत लढत असल्याचे पाहिले आहे. मी आयुष्यात कधीही हार मानली नाही. निकाल काहीही लागो, त्यानंतर मी आणखी मजबूत होऊन बाहेर पडेन,” असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm imran khan addresses people of pakisan amid political crisis in country talks about modi nawaz sharif meeting hrc