PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचे लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने या योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याची रक्कम लवकरच मिळणार आहे. सरकारने या संदर्भात तारीख जाहीर केली आहे.
मोदी यांनी २०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपये, असे वर्षातून सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत दोन हजार रुपयांचे १३ हप्ते पूर्ण झाले आहेत. १३ वा हप्ता २७ फेब्रुवारीला देण्यात आला होता आणि शेतकरी आता १४ व्या हप्त्याची वाट पाहत होते.
‘या’ दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता
सरकारने केलेल्या घोषणेनुसार येत्या २८ जुलैला शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता मिळणार आहे. या दिवशी देशातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांना १४ वा हप्ता दिला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)द्वारे १८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, राजस्थान येथील नागौर जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा १४ वा हप्ता ट्रान्सफर करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी हजेरी लावणार आहेत आणि स्वत: बटण दाबून शेतकऱ्यांच्या ऑनलाईन खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहेत.
हेही वाचा : Video: वंदे भारत एक्सप्रेसच्या कोचला आग, दिल्लीच्या दिशेनं निघाली होती ट्रेन!
पीएम किसान योजनेचे फायदे
या योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना वर्षाचे सहा हजार मिळतात. वर्षातील तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतात. शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे.
हेही वाचा : देशातील सर्वात मोठ्या बँकेचा नफा ११,९५१ कोटींवर पोहोचला, ‘असा’ मिळणार फायदा
शेतकरी या योजनेचे लाभार्भी आहे की नाही, हे कसे जाणून घ्यावे?
- पीएम किसानच्या वेबसाइटवर जा.
- फॉर्मस कॉर्नरमध्ये बेनिफिशरी स्टेटस दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यात आधार कार्ड नंबर आणि बँकेशी संबंधित मोबाईल नंबर भरा.
- काही क्षणातच पीएम किसान योजनेचे तुम्ही लाभार्थी आहे की नाही कळेल.