पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम किसान सन्मान निधीचा दहावा हप्ता जारी केला आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्यात सरकारने दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २० हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. पीएम किसान योजनेंतर्गत, सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ४ महिन्यांच्या अंतराने २हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या पैशातून शेतकरी बियाणे आणि खते यासारख्या आवश्यक गोष्टी सहज खरेदी करू शकतात.
आतापर्यंत या योजनेचे ९ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. सरकारने देशातील ११.३७ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये १.५८ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित केली आहे. तुम्हालाही पीएम किसान सन्मान निधीच्या यादीत तुमचे नाव तपासायचे असेल, तर तुम्ही या सोप्या स्टेप्स फॉलो करा.
- पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in वर जा
- त्यानंतर ‘शेतकरी कॉर्नर’ या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
- आता ‘Get Report’ वर क्लिक करा.
- तुमच्या समोर एक लिस्ट ओपन होईल, त्या लिस्टमध्ये तुमच्या खात्याची स्थिती कळेल.
‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ४००० रुपये
ज्या शेतकऱ्यांना अद्याप नवव्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही, त्यांच्या खात्यात दोन हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होतील. म्हणजेच चार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. पण ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी नोंदणी केली आहे.
तुमचे नाव यादीत नसल्यास येथे कॉल करा
तुमचे नाव पीएल किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्याच्या यादीत नसल्यास हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता. १५५२६१ आणि ०११-२४३००६०६ हे क्रमांक आहेत . येथे तुमचा संपूर्ण मुद्दा ऐकला जाईल आणि कमी वेळेत त्यावर तोडगाही काढला जाईल.