श्रीलंकेसमवेत असलेले मतभेद तडीस नेण्यासाठी भारतीयांकडून आलेला दबाव आणि पाच राज्यांमधील विधानसभेच्या निवडणुका यामुळे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘चोगम’ परिषदेला हजर न राहण्याचा निर्णय घेतल्याचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी येथे स्पष्ट केले.
देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत असून पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीच्या या निवडणुका आहेत. त्याचप्रमाणे आर्थिक सुधारणांसह विविध आर्थिक प्रश्नांवरही निर्णय घ्यावयाचे आहेत. त्यामधील काही प्रश्न संसदेच्या हिवाळी अधिवेशनात येणार आहेत. त्यामुळेच पंतप्रधान चोगम परिषदेला हजर राहू शकले नाहीत, असेही खुर्शीद म्हणाले.
या सर्व पाश्र्वभूमीवर डॉ. सिंग यांनी  परराष्ट्र व्यवहारमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठविण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा