केरळला भाजपच्या राष्ट्रीय परिषदेस रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ७ लोककल्याण मार्ग या निवासस्थानी लष्करप्रमुख, वायुदल प्रमुख व नौदलाच्या उपप्रमुखांबरोबर बैठक घेतली. उरी येथील लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या या बैठकीस अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायचे झाल्यास भारतीय सुरक्षा दलांची सध्याची स्थिती व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीविषयी माहिती जाणून घेऊन चर्चा केली.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साऊथ ब्लॉकमधील वॉर रूममध्ये जाऊन लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला होता. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत लष्करी अधिकाऱ्यांशी विस्तृत चर्चा केल्याचे सांगण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केरळमधील कोझिकोडे भाजपच्या राष्ट्रीय परिषदेस रवाना झाला आहेत. तत्पूर्वी त्यांनी सैन्य दलातील सर्वोच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उरी हल्ल्यानंतर प्रथमच जाहीर सभा घेत असलेले नरेंद्र मोदी हे विषयावर बोलण्याची शक्यता आहे.
दि. २० सप्टेंबर रोजी वॉर रूममध्ये झालेल्या आढावा बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि सैन्य दलाच्या तिन्ही विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा