“पंतप्रधान नरेंद्र मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत” अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. “पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी चीनसाठी त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. पंतप्रधान मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

पूर्व लडाखच्या पँगाँग सरोवराच्या भागातून भारत आणि चीन दोघांकडून सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु असताना राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य केले. “पँगाँग टीएसओमधील फिंगर फोरपर्यंत भारताची हद्द आहे. असे असताना, सैन्याला फिंगर तीन पर्यंत जाण्यास का सांगण्यात आले?” असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. पंतप्रधान मोदींनी भारताची भूमी चीनला दिली हे स्पष्ट होते असे राहुल म्हणाले.

आणखी वाचा- नऊ महिन्यानंतर चीनने अचानक माघार का घेतली? पडद्यामागे नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

“रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या देसपांग प्लेन्सच्या भागाबद्दल संरक्षण मंत्री एक शब्दही बोलले नाहीत. तिथे सुद्धा चीनने अतिक्रमण केले आहे. मोदींनी भारताची भूमी चीनला दिली आहे, त्याबद्दल त्यांनी देशाला उत्तर दिले पाहिजे” असे राहुल गांधी म्हणाले.

Story img Loader