पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौरा संपवून शुक्रवारी सकाळी अफगाणिस्तान दौऱयासाठी राजधानी काबूलमध्ये दाखल झाले. काबुल विमानतळावर अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोहम्मद हनिफ अत्मर आणि परराष्ट्र मंत्री हेकमत कर्झई यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर मोदींनी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांची भेट घेतली. या भेटीनंतर भारताच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या अफगाणिस्तानच्या नव्या संसदेच्या इमारतीचे मोदींच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यानंतर अफगाण संसदेच्या संयुक्त सभेला मोदी संबोधित करणार आहेत.
दरम्यान, काबुलमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी ट्विट देखील केले. मोदी म्हणाले, काबुलमध्ये मित्रांना भेटल्याने आनंद झाला असून, राष्ट्रपती अश्रफ गनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुला आणि माजी राष्ट्रपती हमिद करझई यांची भेट घेणार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा