PM Narendra Modi 11 Days Fast Broke Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज २२ जानेवारीला अयोध्येतील बहुचर्चित रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडला. कोदंडधारी रामाच्या बालरुपातील मूर्तीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. ५०० वर्षांची प्रतीक्षा आज संपली अशी भावना आज प्रत्येक रामभक्ताच्या मनी आहे. मोदींच्या हस्ते हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडण्याआधी पंतप्रधांनानी आपण ११ दिवसांचे धार्मिक अनुष्ठान स्वीकारणार असल्याचे सांगितले होते. या कालावधीत मोदींनी ११ दिवस उपवास केला होता तसेच, जमिनीवर झोपणे, गायींना चारा खाऊ घालणे, मंदिरांना भेट देणे अशीही कामे त्यांनी केली होती. आज प्राणप्रतिष्ठाणपना सोहळ्याच्या नंतर मोदींनी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हातून प्रभू रामाच्या चरणामृत प्राशन करून आपला उपवास सोडला. यावेळी गोविंदगिरी महाराजांनी मोदींचे कौतुक करत त्यांनी हे अनुष्ठान कसे पाळले याविषयी भाष्य केले.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्ठान स्वीकारण्यापूर्वी मोदींनी ३० दिवस आधीच गोविंदगिरी महाजारांशी संपर्क साधून अनुष्ठानाचे नियम विचारले होते. आज प्राणप्रतिष्ठाणपना सोहळ्याच्या नंतर जमलेल्या भाविकांना संबोधित करताना गोविंददेव गिरी महाजारांनी मोदींचे कौतुक केले. ते म्हणाले की, “मी मोदींना फक्त तीन दिवस अन्नत्याग करून उपवास करायला सांगितले होते मात्र त्यांनी ११ दिवस अन्नत्याग केला. मी त्यांना ३ दिवस जमिनीवर झोपण्यास सांगितले होते पण त्यांनी ११ दिवस इतक्या कडाक्याच्या थंडीत जमिनीवर झोपून अनुष्ठान केले. या कालावधीत सांसर्गिक देशांमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता ज्यानुसार त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यातून राममंदिरांना भेट दिली, तिथल्या शक्तींना मोदींनी आजच्या या सोहळ्यासाठी येण्याचे आमंत्रण दिले.”

Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
pm narendra modi criticized congress
PM Narendra Modi : “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक, ना ब्रेक, चालकाच्या सीटसाठीही…”; धुळ्यातील सभेतून पंतप्रधान मोदींचे टीकास्र!
Mulik joins Tingre for campaign in Wadgaon Sheri seat
आमदारकीचा शब्द मिळताच कट्टर विरोधक झाला मित्र, कुठे घडला हा प्रकार !

दरम्यान, मोदींचा उपवास सोडण्यासाठी त्यांना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना व आरतीनंतर गोविंददेवगिरी महाराजांनी चरणामृत पाजले. महाराजांच्या हस्ते चरणामृत स्वीकारल्यावर मोदींनी दोन्ही हात जोडून वाकून महाराजांना नमस्कार केला. मोदींची ही कृती सध्या व्हायरल होत असून अनेकजणांनी याचे कौतुकही केले आहे.

दरम्यान, गोविंदगिरी महाराजांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून त्यांना निश्चयाचा महामेरू व श्रीमंत योगी म्हणून संबोधले आहे. अलीकडे राजकीय पुढारी एखाद्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जाताना काहीच कष्ट घेत नाहीत पण मोदींनी भारतातील सर्वोच्च आदर्श पुरूष प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी काय करावे लागले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे कौतुकास्पद आहे असेही गोविंदगिरी महाराज म्हणाले.