पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (Chittaranjan National Cancer Institute in Kolkata) दुसऱ्या कॅम्पसचं व्हर्च्युअली उद्घाटन केलं. यावेळी बोलताना त्यांनी २०१४ पासून देशाने केलेल्या प्रगतीचे उदाहरणे देत केंद्र सरकारची कामगिरी सांगितली. तसेच करोना काळात पश्चिम बंगालला दिलेल्या मदतीचीही माहिती दिली.

नरेंद्र मोदी म्हणाले, “कॅन्सर या आजाराचं नाव ऐकलं की गरीब आणि मध्यमवर्गीय हिंमत हरायला लागतात. गरीबांना याच वाईट चक्रातून, चिंतेतून बाहेर काढण्यासाठी देश स्वस्त उपचारासाठी पावलं उचलत आहे. मागील काही वर्षात कँसरच्या उपचारासाठी औषधांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली. आयुष्मान भारत योजना आज affordable आणि inclusive healthcare च्या बाबतीत जागतिक संकेत बनलीय. PM-JAY अंतर्गत देशात २ कोटी ६० लाखपेक्षा अधिक रूग्ण मोफत उपचार घेत आहेत.”

Supriya Sule At Press Conference.
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, “नैतिकता सांभाळून धनंजय मुंडेंनी राजीनामा….”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस
Vijay Wadettiwar
“जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य
Radhakrishna Vikhe Patil On Sujay Vikhe
Vikhe Patil : “भावना दुखावल्या हे मान्य, पण वक्तव्याचा विपर्यास…”, राधाकृष्ण विखेंकडून सुजय विखेंच्या विधानानंतर सारवासारव
Bajrang Sonawane On Amol Mitkari
Bajrang Sonawane : “अमोल मिटकरींना हे खूप महागात पडेल”, खासदार बजरंग सोनवणेंचा थेट इशारा
Image Of Gautam Adani And Narendra Modi
Modi-Adani : “मोदींनी प्रत्येक नियम मोडत अदाणींना मोठे केले, पण आता…” अमेरिकेतील खटल्यांवरून माजी केंद्रीय मंत्र्याची टीका
Modi Govt faces criticism for handling economic crisis
“नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या जुमलांपेक्षा…” देशाच्या आर्थिक स्थितीवरून खरगेंची पंतप्रधान मोदींवर टीका

“देशाने नव्या वर्षाची सुरुवात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणापासून केली होती. त्याप्रमाणे नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात पहिल्याच आठवड्यात भारत १५० कोटी म्हणजेच १.५ बिलियन लसीकरणाचा ऐतिहासिक टप्पा पार करत आहे. आज भारताच्या वयस्क लोकसंख्येपैकी ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना लसीचा एक डोस मिळाला आहे,” असंही मोदींनी सांगितलं.

“केवळ ५ दिवसांमध्ये दीड कोटी मुलांचं लसीकरण”

मोदी पुढे म्हणाले, “केवळ ५ दिवसांमध्ये दीड कोटी मुलांचं लसीकरण केलं आहे. हे यश संपूर्ण देशाचं आणि प्रत्येक सरकारचं आहे. मी या यशासाठी विशेष करून देशातील संशोधक, लस निर्माते, आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानतो. सर्वांच्या प्रयत्नांमुळेच देश या संकल्पाच्या शिखरावर पोहचला आहे. याची सुरुवात आपण शून्यापासून केली होती.”

“आतापर्यंत पश्चिम बंगालला ११ कोटी करोना लसीचे डोस मोफत”

“केंद्र सरकारने आतापर्यंत पश्चिम बंगालला ११ कोटी करोना लसीचे डोस मोफत दिले आहेत. बंगालला दीड हजारपेक्षा अधिक व्हेंटिलेटर, ९ हजारहून अधिक नवे ऑक्सिजन सिलिंडर दिले आहेत. 49 PSA नवे ऑक्सिजन प्लँट्स देखील सुरू झाले आहेत,” असं मोदींनी सांगितलं.

हेही वाचा : “पंतप्रधानांच्या सुरक्षेचा कांगावा करणाऱ्या भाजपाचा प्रोपगंडा फुटला” ; व्हिडिओ शेअर करत नाना पटोलेंनी साधला निशाणा

“२०१४ पर्यंत देशात अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट जागांची संख्या ९० हजारच्या जवळपास होती. मागील ७ वर्षांमध्ये यात ६० हजार नव्या जागांची भर पडली आहे. २०१४ मध्ये आपल्याकडे केवळ ६ एम्स होते. आज देश २२ एम्सच्या सशक्त नेटवर्ककडे वाटचाल करत आहे,” असंही मोदींनी नमूद केलं.

Story img Loader