ब्रिटनच्या पंतप्रधानपदी प्रथमच भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवारी निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही आहेत. पंतप्रधानपदासाठी सत्ताधारी हुजूर पक्षात पेनी मॉरडाँट आणि ऋषी सुनक यांच्यात शर्यत होती. हुजूर पक्षाच्या ३५७ खासदारांपैकी सुनक यांना १४२ जणांनी पाठिंबा दिला होता, तर मॉरडाँट यांच्याकडे २९ सदस्यांचे पाठबळ होते. नेतेपदी निवड होण्यासाठी आवश्यक असलेला किमान १०० खासदारांचा पाठिंबा मिळणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात येताच मॉरडाँट यांनी माघार घेतली आणि हुजूर पक्षाचे नवे नेते म्हणून सुनक यांची बिनविरोध निवड झाली. सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की वाचा >> Britain PM Rishi Sunak: जावई ब्रिटनचा पंतप्रधान झाल्यानंतर नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “ऋषीचं अभिनंदन, आम्हाला…”

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनक यांची निवड झाल्यानंतर काही तासांनी केलेल्या ट्वीटमध्ये सुनक यांना टॅग केलं आहे. जागतिक मुद्दे हाताळण्याबरोबरच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी उत्सुक आहे, असे ट्विट मोदी यांनी केले. “ऋषी सुनक पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल तुमचे अभिनंदन. जागतिक स्तरावरील विषयांवर तुमच्याबरोबर काम करण्याची वाट पाहत आहे. २०३० पर्यंतची वाटचाल कशी असावी यासंदर्भातील योजना अंमलात आणण्याचा विचार आहे,” असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Wardha, crushed notes caught fire,
नोटांचा चुरा भरलेला ट्रक पेटला, तर्कवितर्क सुरू
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Devendra Fadnavis Dharni, Chikhaldara Skywalk Work,
‘चिखलदरा स्‍कायवॉकचे काम महाविकास आघाडीने थांबविले’, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणीसांचा आरोप
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!

पंतप्रधान मोदींनी सुनक यांचा उल्लेख ‘लिव्हिंग ब्रीज’ असा केला आहे. “ब्रिटनमधील भारतीयांसाठी महत्त्वाचा सेतू असणाऱ्या तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. आपण आपले ऐतिहासिक संबंध नवयुगातील सहकार्यामध्ये बदलूयात,” असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

ब्रिटनने गेल्या सहा वर्षांत मोठी राजकीय अस्थिरता अनुभवली. सहा वर्षांत चार पंतप्रधान झाले. थेरेसा मे यांची पंतप्रधानपदाची कारकीर्द तीन वर्षे १२ दिवसांची होती. ब्रेग्झिट प्रकरणात अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर बोरिस जॉन्सन पंतप्रधान बनले. त्यांनाही कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांच्यानंतर लिझ ट्रस पंतप्रधानपदी आल्या. त्यांची कारकीर्द अल्पजीवी ठरली. करकपातीच्या मुद्यावर अवघ्या ४५ दिवसांत त्यांना पायउतार व्हावे लागले. आता सुनक हे चौथे पंतप्रधान आहेत.