“पराभूत मनाने विजय मिळणे अशक्य आहे. यासाठी मागच्या दहा वर्षात देशाच्या मनोधैर्यात जो बदल झाला, तो खूप महत्त्वाचा वाटतो. याआधी अनेक दशके ज्यांनी सरकार चालवले. त्यांचा भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नव्हता. त्यांनी भारतीयांना कमी समजले. मागच्या दहा वर्षात आम्ही त्या भयावह स्थितीतून देशाला बाहेर काढले”, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. टिव्ही ९ वृत्तसमूहाच्या वार्षिक संमेलन ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’च्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त १० वर्षात काँग्रेसपेक्षा दुप्पट परकीय गुंतवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, “आम्ही एकविसाव्या शतकात छोटा विचार करणे सोडून दिले आहे. आज आम्ही जे करतो, ते बेस्ट आणि बिगेस्ट असते. भारताची प्रगती पाहून संपूर्ण विश्व अचंबित झाले आहे. भारताबरोबर चालण्यात इतर राष्ट्रांना स्वतःचा फायदा दिसतो. काँग्रेसच्या काळातील परकीय गुंतवणूक आणि मागच्या दहा वर्षातील गुंतवणूक पाहा. काँग्रेसच्या काळात ३०० अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक आली आणि आमच्या सरकारच्या काळात फक्त १० वर्षात ६४० अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक आली. आज देशात प्राप्तीकर भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हा सरकारवर दाखवलेला विश्वास आहे.”

मोठी बातमी! विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा, नव्या मंडळाची स्थापना

म्युच्युअल फंडात विक्रमी गुंतवणूक

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, २०१४ पर्यंत देशातील नागरिकांनी म्युच्युअल फंडात ९ लाख कोटी गुंतवले होते. मात्र आज २०२४ मध्ये देशातील नागरिकांनी जवळपास ५२ लाख कोटींहून अधिकची रक्कम म्युच्युअल फंडात गुंतविली आहे. देशात जे परिवर्तन आले, त्यासाठी सरकारची दूरदृष्टी कारणीभूत आहे.

‘नारी शक्तीबद्दल बोलता, मग तसं वागा’, कोस्ट गार्ड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं

काँग्रेस काळात रखडलेल्या प्रकल्पांना आम्ही गती दिली

“माजी पंतप्रधान पंडित नेहरुंनी १९६० च्या दशकात सरदार सरोवर प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते. ६० वर्ष सरदोर सरोवर धरणाचे काम रखडले होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही काम पूर्ण करून २०१७ साली याचे लोकार्पण केले. महाराष्ट्रातील कृष्णा-कोयना योजना १९८० च्या दशकात सुरु झाली. २०१४ पर्यं ही योजना रखडली होती. याचेही काम आम्हीच पूर्ण केले”, अशा अनेक योजनांचा दाखला देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार किती कार्यक्षम आहे, याचे दाखले दिले.

पंतप्रधान पुढे म्हणाले, मागच्या १० वर्षांत मी १७ लाख कोटींच्या किमतीच्या प्रकल्पांची उजळणी केली आहे. तेव्हा कुठे हे सर्व प्रकल्प पूर्ण झाले. मुंबईचा अटल सेतू हा समुद्रावरील सर्वात मोठा प्रकल्पाचे मी नुकतेच उदघाटन केले आहे. मी जी मोदीची गॅरंटी म्हणतो, ती हीच आहे. करदात्याच्या पैशांचा जेव्हा सन्मान केला जातो, तेव्हाच देश पुढे जातो.