पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ताफ्यामध्ये आता मर्सिडीज या आलिशान कार बनविणाऱ्या जर्मन कंपनीची निर्मिती असणारी मेबॅक एस६५० या गाडीचा सामावेश झालाय. पंतप्रधानाच्या ताफ्यातील रेंज रोव्हर व्होग आणि टोयोटा लॅण्ड क्रुझर या गाड्या आधी मोदी वापरायचे. मात्र आता त्याच्या ताफ्यात मर्सिडीज मेबॅक एस६५० ही अत्याधुनिक गाडी शामिल झालीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान मोदी नुकतेच या नव्या मर्सिडीज मेबॅक एस६५० गाडीमध्ये पहिल्यांदा हैदराबाद हाऊसच्या बाहेर दिसून आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारतभेटीदरम्यान मोदी त्यांची भेट घेण्यासाठी याच गाडीमधून पोहचले होते. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील या नव्या सदस्याचं पुन्हा एकदा दर्शन नुकतच झालं.

सर्वात सुरक्षित गाड्यांपैकी एक…
मर्सिडीज मेबॅक एस६५० गार्ड ही अत्याधुनिक आणि अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनात निर्माण करण्यात आलेली गाडी आहे. या गाडीला व्हीआर १० स्तराची सुरक्षा आहे. या प्रकारच्या गाड्यांमधील ही सर्वात सुरक्षित गाडी असल्याचं सांगण्यात येतं. ही जागतील सर्वात महागड्या बुलेट प्रूफ गाड्यांपैकी एक असल्याचं सांगण्यात येतं.

नक्की पाहा हे फोटो >> एका चार्जिंगवर 150 Km धावते, आकाराने नॅनोपेक्षाही छोटी; जाणून घ्या Toyota C Plus pod चे फिचर्स, किंमत

पंतप्रधानांसाठी कोण मागवतं या गाड्या?
स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणजेच एसपीजीच्या खांद्यावर देशामधील अती महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. एसपीजीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या ताफ्यातील नवीन गाड्यांची मागणी केली जाते. एसपीजीकडून सुरक्षेसंदर्भातील गरजा आणि सुरक्षा पुरवण्यात येणाऱ्या व्यक्तीला एवढ्या सुरक्षित गाडीची गरज आहे का याचा विचार करुन नवीन गाडीची मागणी केली जाते.

पाहा खास फोटो >> सव्वा लाखांचं पेन, Apple गॅजेट्सबद्दलचं प्रेम अन् गॉगलची किंमत…; जाणून घ्या मोदींकडील महागड्या वस्तूंबद्दल

एकाच वेळेस अनेक गाड्या मागवल्या जातात कारण…
सामान्यपणे अती महत्वाच्या व्यक्तींच्या ताफ्यामध्ये दिशाभूल करण्यासाठी एकाच पद्धतीच्या अनेक गाड्या असतात. यामुळे महत्वाची व्यक्ती नक्की कोणत्या गाडीत बसलीय हे लवकर कळून येत नाही. म्हणूनच या ताफ्यामध्ये नवीन गाड्यांची ऑर्डर करताना अनेकदा एकाहून अधिक गाड्या मागवल्या जातात.

नक्की वाचा >> अबब… तब्बल चार तास चालली पुतीन यांची प्रेस कॉन्फरन्स, सर्व प्रश्नांना दिली उत्तरं; भारतीयांना झाली मोदींची आठवण

गाडीचं वैशिष्ट्य काय?
मर्सिडीज मेबॅक एस ६५० गार्डमध्ये ६.० लिटरचं ट्विन टर्बो व्ही१२ इंजिन असून ते ५१६ बीएचपीची पॉवर निर्माण करतं. गाडीचा पिकअप टॉर्क अंदाजे ९०० एनएम आहे. गाडीचा सर्वाधिक वेग हा १६० किमी प्रती तास इतका आहे.

नक्की वाचा >> …तर जगातील सर्वात श्रीमंत पक्ष असणाऱ्या भाजपाच्या देणगी मोहिमेचे स्वागत करायला हवं; शिवसेनेचा खोचक टोला

एवढी सुरक्षित आहे की…
मर्सिडीज मेबॅक एस ६५० गार्ड या गाडीची बॉडी आणि काचा बनवण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य हे स्टीलच्या गोळ्यांचाही प्रतिरोध करु शकतं इतकं मजबूत आहे. या गाडीसाठी वापरण्यात येणाऱ्या सामानाला २०१० एक्सप्लोजन प्रूफ व्हेइकलचं रेटींग मिळालेलं आहे. तसेच अवघ्या दोन मीटर अंतरावर १५ किलो टीएनटी स्फोटकांचा स्फोट झाला तरी गाडीला काहीही होणार नाही इतकं हे मटेरियल सुरक्षित आहे. गाडीच्या खिडकीच्या काचांवर पॉलीकॉर्बोनेटचं कव्हरिंग आहे. तर गाडीच्या मागील भाग हा स्फोटांपासून सुरक्षित राहील अशापद्धतीने बनवण्यात आलाय. गॅस हल्ला झाला तर मागील केबीनला विशेष एअर स्पलाय युनीटचीही सोय करण्यात आलीय.

नक्की पाहा >> Video: पाच कोटींचं सोनं परिधान करुन ‘त्या’ शोभायात्रेत सहभागी झाल्या अन्…

इंधनाच्या टाकीवर विशेष आवरण…
मर्सिडीजच्या या मेबॅक एस ६५० गार्डच्या इंधनाच्या टाकीवर विशेष कोटींग करण्यात आलं आहे. यामुळे अपघातानंतर इंधनाची टाकी फुटली तरी आपोआप त्यामधील छिद्रं भरली जातात. बोईंग विमान कंपनीकडून एएच-६४ अपाचे टँक हेलिकॉप्टर ज्या साहित्यांपासून बनवलं जात तेच हे साहित्य आहे. या गाडीचे टायर पंक्चर झाले तरी ती फ्लॅट टायर पर्यायाच्या माध्यमातून वेगाने संटकाच्या काळामध्ये गाडीत बसलेल्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यासाठी वापरता येते.

सीट्समध्येच मजाजर…
गाडीमधील मागील आसनांमध्येच सीट मसाजरची सोय देण्यात आलीय. गाडीतील रेअर सिट्स या अशापद्धतीने बसवण्यात आल्या आहेत की त्या बऱ्याच मागे जाऊ शकतात. यामुळे समोर फार मोठ्या प्रमाणात लेगस्पेस उपलब्ध होते.

नक्की वाचा >> “मोदी उत्तर प्रदेशात जाहीर सभा घेतात आणि दिल्लीत येऊन करोनाबद्दल चिंता व्यक्त करतात; ‘रात्रीस खेळ चाले’चा प्रयोग…”

गाडीची किंमत किती?
समोर आलेल्या माहितीनुसार मर्सिडीजने मेबॅक एस ६०० गार्ड या गाड्या मागील वर्षी भारतामध्ये १० कोटी ५० लाखांना लॉन्च केल्या होत्या. त्यानंतर आलेली एस ६५० सिरीज ही १२ कोटींपासून सुरु होते.

स्कॉर्पिओ ते बीएमडब्ल्यू…
मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना बुलेट प्रूफ महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये फिरायचे. २०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ते बीएमडब्ल्यू सेव्हन सिरीजमधील गाड्या वापरु लागले.